Homeअपराधग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

दौंड प्रतिनिधी ता. २८ केडगाव चौफुला येथे ४० विद्यार्थ्यांनी ८० मिनिटे न थांबता स्केटिंग करत रचला विक्रम केडगाव चौफुला येथील शिवांजली रॉयल सिटी येथे शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्केटिंगपटूंनी ८० मिनिटे न थांबता स्केटिंग करण्याचा जागतिक विश्वविक्रम पूर्ण केला. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी एकाच उपक्रमांतर्गत हा विश्वविक्रम करण्यात आला असून, ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या तब्बल ४० विद्यार्थ्यांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारकांना मानवंदना देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय भावना निर्माण करणे हा या विश्वविक्रमाचा मुख्य उद्देश होता. विशेष म्हणजे या उपक्रमात ३ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विश्वविक्रमाची नोंद युरोपियन युनियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, फॉरबेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि युनायटेड अरब अमिरात वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या तीन जागतिक विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी घेतली. या विश्वविक्रमात भूमी खामकर, ध्रुवा खामकर, अनन्या फुले, आयुषकार फुले, सुधीर वाघापुरे, नील चव्हाण, आर्वी टुले, आर्यन जगदाळे, राजवीर दळवी, आदर्श टेंगले, हर्ष थोरात, अदिती शेळके, द्रिशा कुंगीर, साईराज थोरात, गौरी सांगडे, मृणाली खंडाळे, क्षितिज कुंभार, ऋत्विक कुंभार, गंधार नवले, क्रिशिव लकडे, सान्वी भोसले, साईराज पाडुळे, रुद्र गोसावी, हर्शल शेंडगे, प्रणिती दुधाळ, अंश यादव, दर्शन शेंडगे, स्वामिनी कारंडे, विराट चालवणी, गौरी टुले आणि आरोही चौधरी यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विश्वविक्रमासाठी विद्यार्थ्यांनी तब्बल एक वर्ष सातत्याने सराव केला. त्यांच्या मेहनतीला अखेर यश मिळाले असून, भविष्यात आणखी कठीण आव्हाने स्वीकारून नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा मानस विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना समाधान दाने सर, गणेश घुगे सर आणि आकाश कसबे सर यांनी प्रशिक्षण दिले. तसेच डॉ. निलेश लोणकर, संदीप टेंगले सर यांचे मार्गदर्शन लाभले. पुणे पोलीस विभागातील प्रियंका दाणे व रूपाली यांनीही या उपक्रमासाठी सहकार्य केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केडगाव चौफुला परिसरातील ग्रामस्थ, पालकवर्ग आणि क्रीडाप्रेमींनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments